Site icon Onecuriousguide

माणूस आणि इतर प्राण्यांमध्ये काही फरक

माणूस आणि इतर प्राण्यांमध्ये काही फरक

माणूस आणि इतर प्राण्यांमध्ये काही फरक

 

माणूस आणि इतर प्राण्यांमध्ये काही फरक

 

आज सहज गच्ची वरती बसलेलो असताना शेजारच्या झडवरती काही वानरे आणि त्यांची पिल्ले मस्ती करत असताना नजरेस आली.

झाडंही ते अगदी पानगळती झालेलं, रोज त्या झाडाची पानं थोडी थोडी खाऊन, राहिलेली थोडी बारीक पाने व त्या झाडाच्या छोट्या फांद्या आणि त्याच फांदीवर ती उरलेली बारीक पाने खाण्यासाठी त्यांची चाललेली धडपड. मोठी वानरे एका फांदीवर निवांत बसली होती. त्यांच्यातल एक पिल्लू खूप लहान बहुतेक एक किंवा दोन आठवड्यांच तरी असेल. तो त्या फांदीवर लटकत होता जी की अगदी बारीक, ओढताच क्षणी तुटेल अशी. त्या पिलाने  मस्ती करत असताना त्या फांदीवर जोरात उडी घेतली.

त्याच क्षणी ते पिल्लू बदकण खाली पडणार की क्षणात त्याचा हात एक फूट खाली असलेल्या फांदीला धरताच त्यांनी तोल सांभाळला. आणि शांतपणे त्या फांदीवर बसला. नेमकं त्या क्षणात काय झाल हे त्याला कळलं नसावं बहुतेक. म्हणून तो अचानक शांतच झाला असावा.
तेवढ्यात एक वांणरीन त्या पीलाजवळ आली आणि त्याला आपल्या मिठीत घेतलं आणि त्याच प्रमाणे ते पिलू लगेच तिला बिलगल. ही त्याची आई असावी.

पहिला तर किती सुंदर हा क्षण . हा क्षण टिपत असताना मानवातील आणि प्राण्यातील एक विरोधाभास जाणवला. माकड,वणार आणि मानव हे एकाच कुळातील प्राणी.

लेकरू पडलं त्याने त्याचं स्वतःला सावरलं आणि पुन्हा व्यवस्तीत स्थिरावल. आई ला पिलासोबत काहीतरी झालं याची चाहूल लागली, ती आली आणि लेकराला जवळ घेतल.
खरंच एवढं सोप असलं असत मानवाचं तर, पण निसर्गाने मानवाला तेवढं भक्कम नाही बनवल .

माणूस आणि इतर प्राण्यांमध्ये काही फरक असेल तर तो विचार, भाषा, आठवणी आणि विश्लेषण करण्याची क्षमता. जर या सर्व गोष्टी मानसाजवळून काढून घेतले तर, जो माणूस उरेल तो ही फक्त प्रेम , वत्सल्य आणि करुणेने भरलेला एक जीव असेल  फक्त .

माणूस आणि इतर प्राण्यांमध्ये काही फरक
Exit mobile version