Site icon Onecuriousguide

The Night Shift | Untold Story of Night Shift

Night Shift

Night Shift

Untold Story of Night Shift

Untold Story of Night Shift

 

रात्र कोणाला आवडतं नाही बर……………..!!!

रात्र प्रत्येकालाच भुरळ घालतं असते. १० वी किंवा १२ वी बोर्ड चां अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना असो किंवा NEET आणि CET च्या.

स्पर्धा परीक्षे चां कंटाळवाणा अभ्यास सुध्दा रात्री खूप गांभीर्याने डोक्यात जाऊ लागतो.

त्याचप्रमाणे प्रेमात पडलेल्या कोणत्याही मुलाला किंवा मुलीला दुरस्त (लाँग distance relationship) मध्ये असताना त्यांच्या भविष्याची स्वप्ने रंगवताना ही रात्र आपली हक्काची मैत्रीण वाटू लागते. आणि प्रेमभंग झालेल्या विरह वेदनात तुटलेल्या प्रत्येकाला रात्रीचा अंधार हक्काचा मित्र वाटू लागतो. नव विवाहित जोडप्यांना रात्र म्हणजे स्वर्ग वाटू लागतो. नवीन – नवीन घर सोडलेल्या आणि बाहेर कॉलेज मध्ये शिकायला आलेल्या प्रत्येक तारुण्याला रात्र म्हंजे एक मुक्त स्वतंत्र जग वाटू लागतं. दुर्भाग्याने विधवा किंवा विधुर झालेल्या जीवांना रात्र म्हंजे एक शाप किंवा नरक वाटू लागतो. तसेच नेमकेच मयत झालेल्या व्यक्तीच्या घरी ती रात्र म्हंजे एक – एक काळ वाटू लागतो.

तर अशाच या रात्रीला आपापल्या परीने जगणाऱ्या या भारत देशात अजून एक जमात या जगापासून एक वेगळीच, शांततेची, कष्टाची, एकट्याची रात्र जगत असते. त्यांच्यासाठी या रात्रीची नशेची ती जादू नसते. त्यांना या रात्री जगून नाही तर जागून काढाव्या लागतात.

कारण तुम्ही, आम्ही, इतर रात्री जशे निवांत शांततेत रात्रीच्या कुशीत या जगाला विसरून निमूटपने सुखाची झोप घेऊ शकतो, तशी प्रेमळ झोपेची कुशी यांच्या वाटेला कधीच येत नसते. खरतर त्यांचं जग हे आपल्या दैनंदिन आयुष्यापेक्षा वेगळं चालत असत. ती जमात म्हणजे कॉर्पोरेट किंवा सरकारी नौकरी वरती रात्रपाळी (nightshift) करणारी तुमच्या आमच्या सभोवताली असणारी ओळखीची किंवा अनोळखी माणसे.

Night shift करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती च्या जीवनातील ही रात्र, रात्र नसून त्यांच्या नजरेत तो दिवस असतो आणि अगदी त्याच वेळी त्यांच्या घरच्यांसाठी ती रात्र म्हंजे फक्त रात्र असते झोपण्यासाठी. म्हणजे एकाच घरी राहून यांना हा ऊन सावलीचा खेळ खेळावा लागतो. निसर्गनियमाच्या विरुद्ध जाऊन जगणं खर तर हे जगणं नसत हे माणसाच्या ह्रासाचं कारण बनतं. कारण कोण्यातरी एका दिवशी हे अस जगणं आणि प्रत्येक दिवशी हे असच जीवन जगणं हा खूप मोठा विरोधाभास आहे.

ईच्छा असो वां न असो पैसे मिळतात म्हणून असं जगावं लागतं. खरतर ही लोक नंतर दिवसाच्या लोकांशी जास्त connected राहू शकत नाहीत. त्यांना काम करताना एवढ्या शांततेची सवय झालेली असते की पुन्हा दिवसाच्या डोकं खायला उठणाऱ्या अशांतीच्या गोंगाटात काम करण्याची आता यांना खरतर भीती वाटत असते. आणि झोपताना आता यांना सतत काहीतरी आवाज बाजूला हवा असतो शांतता दिली तर त्यांना आता झोप लागत नाही उलट त्यांचं डोकं अजून दुसरं काम शोधायला लागेल.

तर अश्या या night shift मध्ये काम करणाऱ्या, रात्री जगणं शोधणारी माणसं दिवसा जगणाऱ्या माणसांपासून दूर व्हायला कधी लागतात आणि एकटेपणा च्या प्रवासाला कधी निघतात हे त्यांचं त्यांना ही कळत नाही. कारण त्यांच्या जगाशी हे प्रकाशाच, दिखाव्याच जग कधीही एकरूप होऊ शकत नाही. या दोन्ही time zone मध्ये जगणारी माणस आपल्या वेळेनुसार कधीही एकमेकांना भेटू शकतं नाहीत.

Office मधून सकाळी घरी ७ वाजता येऊन घरच्यांना सकाळी उठून नेहमीच्या कामाला जाताना बघून आपण दिवसाला संध्याकाळ असं समजून झोपी जायचं. दुपारच्या जेवणा च्या वेळेला आपण उठून नाश्ता करायचा, त्यांच्या चहा च्या वेळेला अपना जेवण करायचं आणि त्यांच्या झोपेच्या वेळेला आपण ऑफिक ला हजार.

ज्यावेळी असंख्य लोक दिवसभर ट्रॅफिक मधून वाट काढत सकाळ च्या सूर्याला नमस्कार करून संध्याकाळी ट्रॅफिकचा समान करत आपल्या घरी पोहोचवून आनंदाने आपल्या कुटुंबासोबत जेवण करून शांततेत रात्रीच्या कुशीत निजतात. त्याचवेळी मावळनाऱ्या सूर्याचा निरोप घेऊन रात्रीला वंदन करून या दिखव्याच्या जगाला टा – टा करून ही लोक कामाला हजर होतात, पुन्हा रात्रीला निरोप देऊन उगवणाऱ्या दिवसाला वंदन करून दीखाव्याच जग चालू व्हायच्या आधीच या कानवरती पडणाऱ्या गोंगाटाला सहन करत झोपायच.

पण ते कुटुंबासोबत जेवण करून शांततेत रात्रीच्या कुशीत निजन्याच परम सुख हे या night shift वाल्यांच्या वाटेला कधीच नाही येत हो.

खरंतर ही रात्र खरच खूप कमाल गोष्ट आहे. ज्याला आवडली ती त्याचीच होऊन जाते. कारण जगात एकच गोष्ट सत्य आहे ती म्हणजे रात्र. मग ती कोणत्याही देशातली असो. दिवस म्हंजे फक्त presence of light… जो फक्त थोड्या कालावधी साठी असतो. पण रात्र कायम truth आहे, आपली आकाशगंगा स्वतः एका अंधाराचा भाग आहे, आपल्या भाषेत कित्येक रात्रीचा एक भाग आहे. आपण झोपतो आपण एका अंधाराकडून दुसऱ्या अंधरा कडे जातो. तो असतो स्वतः च्या आतला शांततेचा रंग.

तर, night shift जगणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीला सहन कराव्या लागणाऱ्या मानसिक त्रासाला सलाम, ती विनाकारण होणारी चीडचीड, ती कधीही पूर्ण न होणारी झोप, आणि सुट्टी च्या दिवशी आपल्या गावी दूर जाण्यासाठी करावा लागणारा भर दिवसा चा कंटाळवाणा प्रवास, आणि शरीरावर होत जाणारे सतत चे दुष्परिणाम आणि जगापासून तुटलेपणाची न जाणवणारी भीती. या सगळ्या गोष्टींना घेऊन चालणारा एक शूर night shift जगणारा माणूस मझ्या नजरेत खरचं खुप धाडसी वाटतो.

खरचं त्या night shift ला सलाम.

जर तुम्हाला कधी अशी जमाती भेटेल, तर नक्कीच त्याच्या सोबत थोडा जिव्हाळ्याचा वेळ घालावा तो तुम्हाला सांगणार नाही पण तुम्ही त्यांना विचारा त्यांच्या night शिफ्ट विषयी त्यांच्या मनाला खरचं खूप छान वाटेल. की आपण ही या माणसात आहोत या जगाचा एक हिस्सा आहोत, यांना ही आपली काळजी आहे याचा.

तर तुमच्या ओळखीच्या night shift मध्ये काम करणाऱ्या तूमच्या मित्र आणि मैत्रीणी सोबत शेअर करून सांगा की होय तुम्हाला ते कळलेले आहेत.

सलाम तुमच्या Night Shfit जगण्याला !

Untold Story of Night Shift
Exit mobile version