Site icon Onecuriousguide

What is your Religion? कोणता धर्म?

What is your Religion? कोणता धर्म?

What is your Religion? कोणता धर्म?

What is your Religion? कोणता धर्म?

एका सकाळी अनेक माणसे कुठेतरी जाण्याच्या धडपडीत होते. सर्वांची काहीतरी एकच धडपड असते. त्या सर्वांच्या डोक्यात काहीतरी चालू असतं. अशाच घाईमध्ये जाणाऱ्या एका माणसाला, रुपेश शी भेट होते.
रुपेश ला प्रश्न पडतो हे काय चाललं आहे . का ही माणसं एवढ्या घाईत आहेत. कुठे चालली आहेत ही माणसं.रुपेश त्या माणसानं प्रश्न विचारतो,”अरे कुठे जात आहात एवढ्या घाई मध्ये.”
तो व्यक्ती बोलतो ” अरे, तुला नाही का माहिती ? मंदिर बांधायला निघालो आहोत.”
रुपेश : अरे पण कशाच मंदिर आणि का आता?
तो व्यक्ती : अरे आहे एक मंदिर मला नाही माहिती कशाच! पण बरेच लोक ते मंदिर बांधून पूर्ण करण्याचं ठरवते.
रुपेश: अरे पण तू का पळत आहेस आपल्याला आहे ना आपल्या गावातील एक मंदिर बस ना मग.
तो व्यक्ती: अरे लेका वेडा का तू ? ते मंदिर आपल्या धर्मा च आहे.
रुपेश : अच्छा तर मग हे गावातील मंदिर कोणाचं आहे?
तो व्यक्ती: अरे गावातील मंदिर सर्वांसाठीच असत. आणि ते मंदिर या पेक्षा ही महत्वाचं आहे म्हणे. आणि ते बंधवाच लागतं नाहीतर काहीतरी अनर्थ होऊ शकतो असे म्हणतात मोठे लोक.
रुपेश: अरे आता कोणता धर्म? आता कोणत्या नव्या देवाची निर्मिती करत आहात ? आधीच देवाच्या नावावर कमी इतिहास झाला आहे का ?
तो व्यक्ती: अरे भावा तू आकलेचा शून्य आहेस. “तू माणूस आहेस की कोण आहेस?” तुला साधा तुझा धर्म माहिती नाही ! जा पाहिले शोध तुझा धर्म जाऊदे मला. खूप कामे आहेत आधीच मागे.
या वाक्याने रुपेश च्या मनावर फार गंभीर घाव तयार झाले. विचारांचे थैमान चालू झाले. आणि मग रुपेश स्वतः चां धर्म शोधू लागला. बरेच दिवस त्याने स्वतः ला खूप प्रश्न विचारले. मी म्हणजे कोण? मी तर माणूस आहे. मग माझा धर्म कोणता? तो व्यक्ती खरंच बोलत होतो मला साधा माझा धर्म माहिती नाही!
त्यानंतर रुपेश ने एक एक करून सर्व धर्मांची पुस्तके वाचून काढली. तरीही त्याच्या मनाच समाधान होत नव्हत. मग त्याने प्रत्येक देशाचा इतिहास वाचला. तरीही त्याचा समाधान होत नव्हतं. मग त्याने त्याच्या ज्ञानात अजून भर घालायचां प्रयत्न केला . अनेक विचारवंत वाचले, भूगोल वाचला. असे करत करत त्या प्रतेक ठिकाणाला भेट देत देत त्यांनी अख्खे जग पालथे घातले. आणि आता कुठे रुपेश ला सर्व गोष्टी कळू लागल्या होत्या. या सृष्टीतील सर्व गोष्टी समजू लागल्या होत्या. तो मनाच्या पातळीवर उच्च स्तरावर गेला होता.
आणि आता त्याला त्या व्यक्ती चे शब्द पुन्हा आठवले., “काय माणूस आहेस तू? तुला तुझा धर्म माहिती नाही”
आणि त्याच्या चेहऱ्यावर एक गूढ हास्य पसरलं. त्याने तो ज्याठिकाणी उभा आहे तिथून सभोवताली  एक नजर फिरवली. त्याला त्यावेळी दिसले, एक छोटीशी मुंगी स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी एक – एक अन्ना चे दाणे घेऊन आपल्या पिल्लानसाठी वारुळात नेत होती.
त्याचं वेळी एक फुलपाखरू फुलांमधून परागकण स्वतः साठी साठविण्यात गुतलेल होत. सभोवतालची वृक्षे त्याला आता प्रसन्न वाटू लागली होती. त्या वृक्षाच शांत रहाणं, त्याचं आपल्या सभितली असणाऱ्या जीवनाला फक्त देत राहण्याची इच्छा. त्याचं या पृथ्वी शी  या सजीव सृष्टिशी असलेलं आपुलकीचं नातं त्याला दिसतं होत. पक्षांचं आपल्या पिलांसाठी घरटे बंधन, अन्न शोधन आणि निसर्गाशी असलेलं त्यांचं प्रेमाचं नातं आता त्याला खूप स्पष्ट दिसत होत.
कारण आता त्याला त्याचा धर्म काळाला होता. कारण आता त्याला हे कळलं होत की ज्या व्यक्तीने त्याला प्रश्न केला होता.” काय माणूस आहे तू? तुला तुझा धर्म माहिती नाही!” या प्रश्नावर आता त्याला खूपच जास्त हसू येत होत. कारण त्या व्यक्तीच्या प्रश्नाचं उत्तर खर तर त्या प्रश्नातच होत.
पण रुपेश ला आता दुःख त्या व्यक्तीच्या विषयी वाटतं होत. ज्याने मला  माझा धर्म काय हे सांगितलं. आणि त्याच व्यक्ती ला खर तर त्याचा धर्म माहिती नव्हता.
तुम्ही म्हणत असाल यात उत्तर कुठे आहे? जर तुम्हालाही अजून उत्तर भेटल नसेल तर पुन्हा वाचा.
विचार स्वतः ला प्रश्न, शोधा उत्तर आणि कमेंट मध्ये सांगा.
Rupesh
Exit mobile version