cropped OCG 6 removebg preview 1

Curiosity is the Mother of All Writers

OneCuriousGuide

Signature Stories of OCG

The Kerala Story Movie Review
The Kerala Story Movie Review
मझ्या आयुष्याची कहाणी तुमचा आवडता एक चहा चा कप | My Name is Cup
मझ्या आयुष्याची कहाणी तुमचा आवडता एक चहा चा कप | My Name is Cup
LGBTQ Month 2023
LGBTQ Month 2023
Babi hi Vaat Ektichi - Va. Pu. Kale
Babi hi Vaat Ektichi - Va. Pu. Kale

About (OCG) One Curious Guide

Onecuriousguide पुस्तकांच्या जगातून, माणसांच्या गर्दीतून, सह्याद्री च्या दऱ्या खोऱ्यातून, समुद्राच्या ओल्या-कोरड्या रेतीतून चालत असताना मला भेटला आयुष्याविषयी कुतुहुल जिवंत असणारा एक उस्तुक मार्गदर्शक (OCG) the best marathi blog site.

ज्याला Philosophy, Psychology, Science, History, Culture, Art and Geography या विषयात मुळी रस आहे. त्याच्यावरती कोणत्याही जातीचा आणि धर्माचा ठिपका नाही. आणि कोणत्याही लिंगात त्याला वेगळं करता येत नाही कारण तुम्ही त्याच्याशी बोलताना तो सहज तुमच्या स्वभावात मिसळून जातो. याला भाषेचं सोयर सुतक नाही, कोणत्याही भाषेशी सहज नाळ जुळते, तरीही मराठी ही त्याची जिव्हाळ्याची मैत्रीण आहे. मुळात ते एक लहान बाळ आहे ज्याला फक्त माणसाची नाती माहिती आहेत व्यवहार नाही. माणूस आणि माणसांची नाती जपणं याला तो एक मानवी लेकरू म्हणून आपले कर्तव्य सामतो. वाचणे, भटकणे, विचार करणे, लिहिणे आणि मनसोक्त आनंदी जगणे हे त्याचे आवडते छंद.

याला राग नाही, लोभ नाही आहे तर फक्त प्रेम, प्रेम आणि प्रेम  या जगावरती, या मातीवरती आणि या जगण्यावरती. 

याचा शब्दांपेक्षा कृती वरती जास्त भर असतो. मनाने ते अगदी निष्पाप अल्लड बाळासारखा आहे तर अनुभवांनी ते आपल्यापेक्षा कितीतरी प्रगल्भ (mature) आहे. असाच एका वळणावरती एकटा अडकलेला असताना मला हा भेटला ocg, त्याने मला तिथून बाहेर काढल रस्ता दाखवला आणि मझ्या सोबत प्रवासात कितीतरी नवीन आणि आपल्याला विचार करून कृती करायला भाग पाडतील अश्या खऱ्या खुऱ्या गोष्टी सांगितल्या. आता आम्ही खूप चांगले मित्र आहोत . 

तर तुम्ही येथे OCG च्या दृष्टिकोनातून आपल्याच सभोवताली असणाऱ्या काही गोष्टी ज्यांच्याकडे अपल सहज लक्ष जात नाही, काही विषय ज्यांना आपण येवढं महत्व देत नाहीत (खरतर द्यायला पाहिजे), काही पुस्तके जी आपण सहज वाचत नाही, काही प्रवास मोबाईल च्या फोटोग्राफी मुळे आपण तो अनुभवायचा राहून गेलेला असतो, आपल्याच समाजातील काही गोष्टी ज्या आपण पाहतो पण मुद्दाम दुर्लक्षित केलेल्या असतात, काही ऐतिहासीक व्यक्त आणि संशोधक आपल्यापासून अजूनही दुर्लक्षित आहेत, शिक्षण घेत असताना आपल्याला तो विषय शिकायला आवडतो की फक्त एखादा व्यक्ती करतोय म्हणून त्या विषयात एडमिशन घ्यायचं अश्या बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टीवर संवाद साधणार आहे, गोष्टी सांगणार आहे आणि तुमच्या प्रश्नावरती मार्गदर्शन करणार आहे.

नक्कीचं तुमचं आणि ocg चं नात ही मैत्रीत रुपांतरीत होईल याची मला खात्री आहे.

books imagination still life 1

Write for Us

तुमची कथा तुम्ही जगासोबत शेअर करण्यास उत्सुक आहात का?

Free Guest Posting Site 2023

write for us

FAQs of Marathi Blog Site

CONTACT US