आभास | Illusion of Life
आभास | Illusion of Life

आभास | Illusion of Life

आभास

कधि वेळ काढ्लाय कोणी, नभा कडे पहाण्यास. असेल कधि वेळ तर पहा . थोड थांबा विचार करा , नभाच्या पडद्यावरती कितीतरी खेळ तो दाखवत असतो . कधी प्रेरणा देतो तर कधी मनःशांती. मुळी तर हा असा कोनताही पडदा अस्तीत्वात नाही. तरीही या आभासावरती आपण रमत अहोतच ना. त्याच्या असण्यावरती विश्वास ठेवतो . खरं तर याच जागेवरच्या इतर गोष्टींच्या मदतीने तो ते आभासी द्रुश्य निर्माण करत असतो.

किती बहुविध रूप त्याची
कधी शांत, सुंदर,सुखावनारा
तर कधी भडक, तप्त रागवनारा.

पहाटेच्या वेळी आभाळात नानाविध छ्टा , ती लाल ,गुलाबी रंगांची आसमंतात उधळण, ते त्याच शांत आणि मोहक रूप असं वाट्त हे चित्र नेहमी असच असाव, पण हे अस मोहक चित्र कधिच राहु शकत नाही हेच त्याला सांगायच असाव. ते सुंदर रुप मनात साठ्वत नाही तोपर्यंत त्याच ते उग्र रूप दिसायला लागत, नको असनारे ते ऊन्हाचे चटके त्याच भडक रूप, तप्त वातावरण हे सगळं नकोसं वाटू लागतं, पण नंतर त्याची सुद्धा सवय करून घेतो आपण. कारण त्याच हे रूप नसेल तर अस्तीत्वाला आकार येनार कसा , जगण्याला दिशा मिळणार कशी.? तो सांगत असतो की , मार्ग मिळवायचा असेल तर , तपावं पण लागतं, स्वतःला तळपाव पण लागतं. कधी कोणाला हे रूप आवड्णार नाही , कधी कोणाला हे रूप रुचनार नाही, पण सवईने आपण त्याला सामावूण घेतोच की

सायंकाळी पुन्हा तोच दिलासा, तेच लोभस रूप , तीच शांती, पण या शांतीची नशाच वेगळी. काहीतरी गुपितं असल्यासारखी. जणु सांगु ईच्छितो की , मी जन्मलो तेंव्हा असाच निरागस होतो आणि यावेळेपर्यंत येताना खूप त्रासातून गेलो , कुणी छळल , कुणी फ़सवल , कशाच्या शोधात तळपत होतो शेवटी येथेच मावळायच होत.

सांज ढ्ळली , दिवस सरला
नभानेही रंग उधळला,
काळोखाला अर्थ गवसला.

जाताना त्यानी दिवस भर अभिव्यक्त केलेले सर्व रंग तो एकत्र सामावुन घेतॊ , जाताना विचारांच्या गर्तेत सर्वांना सोडून जातो , आता ना कोणताही रंग असतो , ना तो , नाही त्याने तयार केलेला आभास असतो . जाताना तो सर्वांना खर् रूप दाखवून जातो, पण त्याला ही महीती असावं माणसाला खर्या अस्तित्वापेक्षा खोट्या अभासावर्ती जगण्यात आनंद मिळतो . म्हणुनच खर्या अस्तीत्वाचा विसर पडावा म्हणुन मोह घालणार जग दाखवतो,जस की काळ्याशार थाळी वरती निळ्या लुकलूकत्या मोत्यांची आरास सजवून ठेवतो, कोनता मोती तुटून पडला तरी आपन त्याची काळजी करत नाही.तर डोळे मीटून तो आपल्या पदरात पडावा अशी ईच्छा व्याक्त करतो , खरं तर आपण त्यांची संख्या मोजुही शकत नाही ,आणि त्याना वेचूही शकत नाही, तरीही त्याकडे लोभसपणे पाहत राहतो. अंधाराच्या खार्या अस्तीत्वात आभासी प्रकाश किरणे शोधत असतो आणि माणूस म्हणून जगताना आम्ही माणुस नसतो.

Rupesh

0 Shares

This Post Has One Comment

Leave a Reply