Babi hi Vaat Ektichi - Va. Pu. Kale
Babi hi Vaat Ektichi - Va. Pu. Kale

Hi Vaat Ekatichi | बाबी – ही वाट एकटीची

Babi hi Vaat Ektichi | बाबी – ही वाट एकटीची

 

Babi hi Vaat Ektichi

Babi hi Vaat Ektichi

 

एका प्रवसाला निघण्यापूर्वी बस स्टॉप वरती गाडी ची वाट पाहत असताना, माझं लक्ष त्या स्त्री वरती गेलं. बहुतेक नेमकीच आली असावी. इतका वेळ मी, माझे विचार, सभोवताली पडणारा  हा सौम्य पाऊस, समोर हिरवी गर्द झाडी आणि हा रिकाम स्टॉप एवढंच चित्र होत. यात या romantic वाटावी अशी या सुदंर एन्ट्री कधी झाली, हे मला “माझ्या प्रवसाच्या सुरुवातीला कोणती बस येईल आणि माझा प्रवास कुठे सुरू होऊन कुठे संपेल” या विचारात संमजलच नाही.

ती स्टॉप मध्ये येऊ शकली असती, पण ती आली नाही आणि ती आल्यापासून पाऊसाचा जोर पण जरा जास्त झाल्याचा मला जाणवू लागला आहे. ती बस स्टॉप च्या बाहेर एक हिरव्या रंगा ची छत्री घेऊन हलका सफेद आणि अबोली रंगाच्या पंजाबी ड्रेस मध्ये उभी होती. कपाळावरती गोल छोटी टिकली होती, हातात अष्टगंध घेऊन नंतर तो माचिस च्या काडीने कपाळावरती लावताना जेवढा गोल होतो,अगदी तेवढी गोल टिकली होती.
गळ्यात मंगळसूत्र नव्हते, पायाच्या बोटात बीचव्या नव्हत्या आणि विशेष म्हणजे पायातली पैंजण पण नव्हते. डाव्या पायात एक काळा दोरा तेवढा होता.

तिच्या पंजाबी ड्रेस च्या बाह्या अगदी कोपऱ्यापर्यंत येत होत्या.  येवढ्या सिंपल लूक मध्ये सुध्दा अगदी देखणी दिसती दिसतं होती. आणि तेवढीच कॉन्फिडन्ट. एका हातात छत्री जोरात पाऊस, एका हातात शाळेची बॅग आणि
तिची नजर दूर शून्यात हरवलेली होती. जणू तिला आता पावसच्या वेगाची आणि तिच्या पायाच्या त्या काळ्या धाग्या पर्यंत स्पर्ष करणाऱ्या पाण्याची जाणीव सुध्दा होत न्हवती.

मुळात माझा स्वभाव curious, माझ्या गाडी ला ही वेळ होताच, त्यात बोलायला ही कोणी नव्हत अजू बाजूला त्या एकट्या अनोळखी आणि एवढ्या जोरदार पावसात गूढ शांततेत उभ्या असलेल्या स्त्री शिवाय.

आता माझी त्या व्यक्ती ला जाणून घ्यायची उस्तुकता मला स्वस्त बसू देत नव्हती. मी न राहवून त्या स्त्री ला आवाज दिलाच.

“Excuse me…. Hello ma’am excuse me, o hello miss….. Aaho मॅडम ऐकता का..?” असा शेवटी मी जोरात ओरडलोच… तशी खूप वेळची हरवलेली आता भानवरती आली.,

तसा तिच्या हातून तिची ती स्कूल बॅग खाली पडली… क्षणाचा ही विलंब न करता तिने ती उचलली. भिजलीच होती ती पण ती ने हाताने थोड साफ केलं आणि आपल्या पाठीवरती ल टकवली.

ती आता एका खोडकर मुलाची आई आहे अशी भासत होती.

मी तिला सहजच सॉरी, असं बोलून… “जर चुकीने चूक झाली असेल तर माफ करा” या हेतूने सॉरी बोलून शांत झालो.

ती ही बोलली की “यात तुम्ही का माफी मागत आहात, चूक माझीच आहे मीच हरवले होते, जाग आली तेंव्हा कळलं की हातून सगळच सुटलं सुटल आहे., आपण एखद्या क्षणिक गोष्टीत हरवतो
आणि  जाग येते तेंव्हा, सगळं असं पाण्यात वाहून जातं अपेक्षा, ईच्छा आणि विश्वास सुध्दा.” आणि ज्यांनी माफी मागावी अस वाटतं तेंव्हा ती व्यक्ती सोडून सगळं जगं आपल्या चुकीची माफी मागत राहतं

तिच्या या बोलण्याचा अर्थ मला काही लागला नाही… म्हणून मी थोडा शांत झालो. ती स्त्री आता comfortable झाली असावी कारण ती आता बस स्टॉप मध्ये येऊन थांबली, छत्री बंद केली.
शांततेत ऑकवर्डनेस नको म्हणून मी च बोलू लागलो, “माझं नाव अभी, मझ्या गाडीला यायला वेळ आहे आणि तुम्ही?”

बाबी – माझ नाव बाबी आहे… मला कोणत्याही गावी जायचं नाहीये, खर तर माझं सर्व काही हरवलं आहे, त्यात आज सकाळीच माझा शाळेत जाणारा मुलगा तो ही निघून गेला आहे कायमचा,
खरं तर मीच त्याला जायला सांगितलं होत…. पण त्याची ही बॅग इथेच विसरला… म्हणून असेल इथे कुठे तर तेवढी त्याला सोपवली असती, म्हणून आले.

अभी – sorry, पण तुम्हीच जायला सांगितलं…. म्हणजे!!

बाबी – खूप मोठी स्टोरी आहे…….. तुम्हाला जायचं आहे ना.

अभी – हो, पण गाडी येई पर्यंत जर तुमची हरकत नसेल तर, मझ्या पडलेल्या प्रश्नांना शांतता मिळेल.

बाबी – काही विशेष नाही, ज्या मोहाच्या क्षणी प्रत्येक तरुणीला समोरच्या  माणसाच्या खोटे पणाची जाणिव न होता स्वतः ला त्या क्षणात  झोकून देऊन  फक्त, स्वतः च्या तारुण्याची बेभान होऊन लयलूट
करायची असते आणि त्या विश्वासावरती भविष्याची स्वप्ने आखायची…(बहुतेक फसविच ती पण स्वप्ने).   अगदी असच “same” नाही म्हणता माझ्या ही वाटेला आलंच. त्यात ज्याच्या विश्वासावरती समोरची
लढाई लढायची त्यानेच आपला घात करावा, म्हणजे लढाई लढायच्या आधीच हार. आता ही वाट एकटीची.

अभी – माफ करा, तुम्ही एवढ्या खंबीर, practicle, हुशार, तत्वज्ञानी वेगरे वाटता, प्रचंड सहनशीलता आहे तुमच्यात. तरीही तुमच्या वाटेला हे एकटे पण यावं.
तुमच्यावरती  भाळणाऱ्या प्रियकराने तुम्हाला तुमच्या मुलासोबत स्विकारण टाळावं, जन्माच्या आधीच त्याचा जीव घेऊन टाक असं पत्रातून निर्लज्ज पणे सरळ सांगून स्वतः अमेरिकेला स्थाईक व्हावं
आणि तो येईल तेंव्हा तो नक्कीच आपल्या बाळाचा आणि आपला स्वीकार करेल या एकाच खात्री नसलेल्या आशेवरती स्वतः त्या बाळाचा एकटीने समाजाला भिडून ताठ मानेने सांभाळ केला आणि
शेवटी या मुलालाही तुम्ही घर सोडायला सांगता…. हे तुमच्या साठी किती किती त्रासदायक आहे, हे मी समजू शकतो अस म्हणन खरच कठीण आहे!!!

बाबी – तुम्हाला एवढं सगळं माझ्या विषयी कसं माहिती?? म्हणजे तुम्ही माझा सगळा अभ्यास करून आला आहात तर, ही भेट काही योगा योग नाही वाटतं. की तुम्ही ही वाट पाहत आहात बाकीच्या सामाजिक
नजरे  सारखी एकटी लग्ना आधी मुलगा सांभाळणारी बाई म्हणून तुमच्या काही गरजा भागवण्यासाठी.???

अभी – तुमचा काही गैरसमज होत आहे, मागच्या काही महिन्यांपूर्वी व.पू. काळे यांची भेट झाली होती., त्यांनी मला तुमच्या एकटीच्या प्रवासाविषयी सर्व काही सांगितलं. माझ मन भरून आलं., अश्या एवढ्या खंबीर, हुशार, प्रेमळ आणि आपल्या प्रेमा साठी लढणाऱ्या माहान स्त्री चे एकदा दर्शन व्हावे एवढी ईच्छा होती, त्यानंतर मला समजलं तुम्हाला तुमच्या मुलाची आठवण होते तेंव्हा तुम्ही इथे येऊन वाट पाहता आणि नंतर वापस घरी जाता. म्हणून त्यादिवशी नंतर बराच वेळ मी इथे तुमच्या भेटी ची वाट पाहत राहिलो. आणि आज समोर तुम्ही दिसला तेंव्हा ओळखल नाही. जेंव्हा तुम्ही तुमचं नाव “बाबी” सांगितलं तेंव्हा मी धन्य झालो.

बाबी – व.पू. काळे !! त्यांची तुम्हाला भेट झाली ! म्हंजे तुम्ही माझ्या खूप जवळचे, बर तुम्ही त्यांचे कोण? त्यांनी मझ्या बिकट काळात खूप साथ दिली. त्यांनीच मला “ही वाट एकटीची” ही
कादंबरी लिहिण्यासाठी पाठबळ दिलं. आणि या कादंबरी ला “महाराष्ट्र राज्य पुरस्काराणे” सन्मानित करण्यात आलं.

अभी – मी त्यांचा मित्र हवं तर विद्यार्थी सुध्दा म्हणू शकता. खरचं तुम्ही फार ग्रेट आहात. जीवनविषयक एक कठोर तत्वज्ञान तुम्ही परखडपणे जगाला आहात. हे ज्ञान तुम्हाला अजून सुंदर बनवत.
तुमच्याशी भेटून इथून पुढे माझ्या आयुष्याचा प्रवास तुमच्या सोबत पूर्ण करावा असं मला वाटतं? व्यवहारीक जागत माझं शिक्षण MBA आहे पण मला व्यवहार जास्त जमत नाही म्हणून मी कलेशी मैत्री केली आहे.
त्यातूनच माझा सुखी आणि समाधानी उदर निर्वाह होतो.  तुमची इच्छा असेल तर या भटक्या सोबत आयुष्याच्या शेवटच्या प्रवसा पर्यंत साथ देणार का?

बाबी – तू मला आता तुम्ही वगेरे न  म्हणता फक्त तू असं बोल, व.पू. काळेंचे विद्यार्थी म्हणल्या वरती तुमच्या चारित्र्यावर संशय घेण्याचा प्रश्न च उरला नाही. तुम्ही कोणतेही आढे – वेढे न घेता
indirectly लग्नाची मागणी घातली यावरती मला खूप छान वाटलं. इथून पुढे ही वाट एकटीची फक्त मृत्यू च्यां च जगात मिळो एवढी च मागणी मी तुमच्या कडून करू शकते.

अभी- नक्कीचं तुझी साथ आयुष्याच्या शेवट पर्यंत एकटी पडू देणार नाही हे वचन देतो. चला आपली गाडी सुध्दा आली. तुझे वडीलांसमान गुरुजी आणि काकू सुध्दा योग्य स्थळी पोहोचले आहेत.
आपल्याला ही तिकडेच जायचे आहे. ते आपली वाट पाहत आहेत., येताय ना…….?

बाबी – हो, हा हात हातात घ्यायला विसरलात वाटत.

आतापर्यंत पाऊस संपलेला असतो., आता सौम्य गार वाऱ्याची झुळूक सभोवताली पसरलेली असते, बाबी च्या चेहाऱ्या वरती लाजे ची लाली चढलेली असते अभी च्या नाजरेतून ती कशी सुटणार.

तेवढ्यात तिथून गरम वाफाळलेला चहा घेऊन जाणारा मुलगा बाबी च्या नजरेस पडतो, ती त्याला आवाज देते.

बाबी – “दोन फुल आद्रक वाली चहा.”

अशा मनमोहक वातावरणात ती दोघी चहा च्या वाफे सारख्या आपल्या आयुष्यातील भूतकाळाच्या गोष्टीही बाहेर सोडतात. आणि प्रत्येक घोटा गानिक आयुष्यातील हा सुंदर प्रसंग आपल्या आठवणींत साठवत राहतात.

अभी बाबी च्या नजरेत बघतो तिचा हात प्रेमाने हातात घेतो आणि बस मध्ये चढतो. बाबी च्या चेहऱ्यावरती एक आनंद असतो. शेवटी एकटीचा प्रवास संपला याचं समाधान
ती च्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसू लागतं. आणि ते दोघं त्या बस मध्ये बसून आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला मार्गस्थ झाले.

Author:
Rupesh Bidkar
rupeshbidkar33@gmail.com

” ही वाट एकटीची ” ही व. पु. काळे यांची महाराष्ट्र पुरस्कार प्राप्त अशी एक अप्रतिम कादंबरी आहे.

‘ सत्याला सामोरं जाण्यात काय लज्जत आहे हे या डरपोक लोकांना कधी कळणारच नाही का..?” हा विचार या कादंबरी मध्ये ‘बाबी’ या नायिकेच्या पात्राद्वारे व.पु.काळेंनी अतिशय प्रभावीपणे मांडला आहे.

Hi Vaat Ekatichi

0 Shares

Leave a Reply