मझ्या आयुष्याची कहाणी तुमचा आवडता एक चहा चा कप | My Name is Cup
मझ्या आयुष्याची कहाणी तुमचा आवडता एक चहा चा कप | My Name is Cup

मझ्या आयुष्याची कहाणी तुमचा आवडता एक चहा चा कप | My Name is Cup and I am Not a Coffee Mug

 

My Name is Cup and I am Not a Coffee Mug
My Name is Cup and I am Not a Coffee Mug

नाम तो सूना ही होगा, may name is Cup and I am not a coffee mug,

हा मला माहिती आहे , मला पाहिल्याबरोबर तुमच्या ओठांवर लगेच चहा ची तलफ सुटली असणार. खरंच माझ्या जीवनाचा अविभाज्य भागच आहे तो. माझ्याशिवाय तो आणि त्याच्या शिवाय मी अपूर्णच.

Heartfelt Story of Tea Cup
Heartfelt Story of Tea Cup

काही मॉडर्न म्हणवणाऱ्या लोकांनी आमच्या नात्यात ताटातुट करण्याचा प्रयत्न केला. पण कोणतही नातं प्रामाणिक असेल ना तर त्याला कोणीच तोडू शकत नाही. उगीचच माझा आकार वाढवून त्याला कॉफी मग म्हणायला लागले.

अरे एकतर जन्म माझा कप, नाव माझ कप, मला पाहताच तुम्हाला चहा पिण्याची तलफ होते. आणि यांचं काहीतरी आपलं भलतंच. आणि मलाही कप या नावानेच जगण्यात समाधान मिळत.

My Name is Cup and I am Not a Coffee Mug
My Name is Cup and I am Not a Coffee Mug

 

हा सध्या मी ही जरा fashionable होत आहे. तुमच्यासारखाच , जैसा देश वैसा भेस म्हणतात ना तसच. पण माझा वेश आणि रूप कसही असलं तरी, माझं नाव मला खूप प्रिय आहे. हे तुम्ही ही चांगलाच ओळखता. म्हणूनच, तुम्ही भैया दो

कप चाय, म्हणाल्यावर तो काचेचा ,कागदाचा किंवा चिनी मातीच्या कोणत्याही  आकारात घेवून आला तरी तुम्ही माझा ही तेवढ्याच आदराने स्वीकार करता हे ही नाकारता येत नाही.

My Name is Cup and I am Not a Coffee Mug
My Name is Cup and I am Not a Coffee Mug

पण  कधी कधी मला तुमचं वागणं काही पटत नाही.  International Tea day हा माझ्याशिवाय कसा पूर्ण होऊ शकतो.

ठीक आहे तुम्ही माझं नाव घेत नाही त्याच मला काही वाटतं नाही. कारण चहा तिथे मी आणि मी तिथे चहा आलाच.

पण जो अमृततुल्य घोट तुमच्या बोरिंग feeling ला तरतरी आंनण्यासाठी, स्वतः झळ सोसून तुमच्या ओठांपर्यंत पोहोचवतो आणि त्यानंतर तुम्ही मला अशा अवस्थेत सोडून जाता. जिथे माझ्या जीवनाची जराही

शास्वती नसते .  जेंव्हा मी काचेचा असतो तेंव्हा तुमच्याच दुर्लक्ष पणा मुळे माझ्यावर पाय पडतो आणि मी फुटतो. कागदाचा असतो त्यावेळी विषयचं संपला, कोणत्या कोणत्या गोष्टींचा राग माझ्यावर काढून विचित्र

आकार देवून अगदी तुच्छतेने मला ज्या प्रकारे फेकता तेंव्हा माझं मन ढसाढसा पत्ती  सांडायाला लागतं. आणि जेंव्हा मी काना वाला असतो त्यावेळी हौशीने हातात घेवुन फोटो काढतात खरा पण त्यांनतर तसाच

पडून राहतो एका कोपऱ्यात सुकत जोपर्यंत दुसऱ्या चहाची वेळ होत नाही. आणि मधेच तुमचं कोकरू माझ्यावर धडपडल की, कान ही गेला कप ही फुटला हाती राहिली पत्ती.

Heartfelt Story of Tea Cup
Heartfelt Story of Tea Cup

 

असा विचित्र अनुभव मला तुमची चीड आणतो. आणि मग त्यावेळेस वाटतं की आपण कॉफी मग म्हणूनच राहायला हवं का ? छान दिसणारा मॉडर्न, माझ्यावर कलाकुसर करून हॉल मध्ये ऐटीत तरी राहता येत. नाहीतर कुणातरी “ती” च्या आठवणींचा किस्सा तरी बनता येत.

पण पुन्हा आठवत , लोकं काही बदलतं नसतात आणि त्यांच्यामुळे आपलं आसंणपण का सोडायचं ! खरा आनंद तर आपलं होऊन जगण्यातच आहे. जेवढा आनंद देऊ शकतो तेवढा द्यायचा देण्याने तो दुप्पट होतो. तुमचं वागणं काहीही असो ,

 

मी कप म्हणूनच जगण्यातच आनंदी आहे.

My Name is Cup and I am Not a Coffee Mug
My Name is Cup and I am Not a Coffee Mug

 

You Can Also Read About: International Tea day

0 Shares

Leave a Reply